पुरोगामी संघटनेने सीईओ देशमुख यांची घेतली भेट…

वृक्षारोपण उपक्रमास सहकार्य करण्याचे केले आवाहन..

देवगड (प्रतिनिधी)दि. १३ जून २०२४

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन जाधव जिल्हा सरचिटणीस प्रकाश वाडकर,देवगड तालुकाध्यक्ष आनंद जाधव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांची भेट घेऊन संघटनेने राज्य कार्यकारिणी सभेत सामाजिक जाणीवेतून पर्यावरण संवर्धनासाठी राज्यामधे ५०हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमाबाबत मार्गदर्शन व आवश्यक ते सहकार्य मिळावे अशी विनंती केली आहे.या झाडांचे चांगले संगोपन करण्याचे आश्वासन संघटनेमार्फत दिले आहे.


तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून केंद्रप्रमुख ,विस्तार अधिकारी रिक्त पदी पात्र शिक्षकांमधून पदोन्नतीने नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली असता आचारसंहिता शिथिल होताच सदर कार्यवाही करण्यात येणार आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी सांगितले.
त्याचबरोबर जिल्ह्यात केवळ देवगड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या अशासकीय रकमा कपात करण्यात येत नसल्याने शिक्षकांना नाहक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून याबाबत योग्य ती कार्यवाही करून सर्वसामान्य शिक्षकांना न्याय द्यावा अशी विनंती केली आहे.या मागण्यांचा विचार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन मान. सीईओ यांनी संघटनेला दिले आहे.
दरम्यान संघटनेने डॉ जी बी कमळकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचीही भेट घेऊन अश्याच आशयाचे निवेदन दिले आहे.

You cannot copy content of this page