इन्सुली येथून निगुडे गावात जाणाऱ्या नळपुरवठा मुख्य जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम सुरु…

गुरुदास गवंडे यांच्या इशाऱ्या नंतर प्रशासनाने घेतली दखल; नागरिकांमधून समाधान व्यक्त..

⚡बांदा ता.१९-:
इन्सुली येथून निगुडे गावात जाणाऱ्या ग्रामीण नळपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सुरु करण्यात आले आहे. जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात होते. यासंदर्भात ग्रामपंचायतला प्रशासनाला सूचना देऊनही देखील यावर कोणती उपाययोजना करण्यात न आल्याने निगुडेचे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी आंदोलन करण्याचा ईशारा ग्रामपंचायत प्रशासनाला दिला होता. त्याची दखल घेत दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.

नळ योजनेचा पंप सायंकाळी ५ ते सकाळी १० वाजेपर्यंत चालू असतो. बारा ते चौदा तास पंप चालू केल्यानंतर पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी पिण्याचे पाणी या ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे वाहून जात होते, असा आरोप गवंडे यांनी केला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासन पाईप लाईन दुरुस्ती करण्यास का दिरंगाई करत आहे?असा सवालही गवंडे यांनी उपस्थित केला होता. यासंदर्भात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांच्या या दुर्लक्षामुळेच पाणी वाया जात असल्याचे गवंडे यांनी सांगितले. पाईपलाईनची येत्या आठ दिवसात दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा ईशारा दिला होता. याची दखल घेत सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी ग्रामपंचायत प्रशासनला तात्काळ पाईपलाईन दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते. जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आल्याने उद्यापासून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page