कलमठ-नाडकर्णीनगर येथे गोवा बनावटीची दारू जप्त…

⚡कणकवली ता.२४-: कलमठ-नाडकर्णीनगर येथे कणकवली पोलिसाना कारवाई करत २४,८00 रुपयांची गोवा बनावटी दारूसह ६ लाख किमतीची कार जप्त केली. ही कारवा बुधवारी दुपारी ३. ३० वाजण्याच्या सुमारास केली. गोवा बानवटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी मनोज रामचंद्र जाधव (४५, रा. कलमठ-नाडकर्णीनगर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.


कलमठ-नाडकर्णीनगर येथे गोवा बनावटीच्या दारू वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार याठिकाणी पोलिसांनी फिल्डिंग लावली होती. मनोज जाधव हा आपल्या ताब्यातील इव्होना कार (एम. एच ०७ एजी ३४००) नाडकर्णीनगर येथील एका हॉस्पिटलसमोर घेऊन आला. त्यानंतर पोलिसांनी गाडीमध्ये काय आहे, अशी त्याच्याकडे विचारणा केली. मात्र, त्याने उत्तर देण्याचे टाळले. पोलिसांना संशय आल्यामुळे सदर कारची तपासणी केली असता गाडीत ११ बॉक्समध्ये भरलेली गोवा बनावटीची दारू आढळून आली. त्याची २४,८०० रुपयांची एवढी किमत आहे. त्यांनतर पोलिसांनी दारूसह कार जप्त करत चालक मनोज जाधव याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात हजर केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, शरद देठे, किरण मेथे, मिलिंद देसाई यांनी केली. याप्रकरणी मिलिंद देसाई यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज जाधव याच्या गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करीत आहेत.

You cannot copy content of this page