⚡कणकवली ता.२४-: शिवसेना उबाठा सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे कट्टर व कणकवली रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बाळा वराडकर यांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार नितेश राणे व माजी आमदार तथा रत्नागिरी-लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख प्रमोद जठार यांनी वराडकर यांचे स्वागत केले.
पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री,माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजपचे शहराध्यक्ष अण्णा कोदे, प्रदेश सदस्य प्रज्ञा ढवण, माजी सरपंच बबलू सावंत, भरत तळवडेकर, विजय गावडे, महेश आंबडोस्कर आदी उपस्थित होते. कणकवली शहरात बाळा वराडकर यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. रिक्षा संघटनेच्या माध्यमातून ते विविध उपक्रम घेत असतात. अशा या सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कार्यकर्त्याने भाजपमध्ये प्रवेश करून शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.