उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत उद्या ठाकरे सेनेची कार्यकारणी बैठक…

रुपेश राऊळ यांची माहिती: सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन..

⚡सावंतवाडी ता.२८-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 4 फेब्रुवारी च्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका शिवसेना कार्यकरण्याची बैठक सोमवारी दि.२९ जानेवारी रोजी आदिनारायण मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व युवासेना व महिला आघाडीच्या सर्व उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य शहर प्रमुख उपशहर प्रमुख उपतालुकाप्रमुख विभाग प्रमुख उपविभागप्रमुख व शाखाप्रमुख सरपंच व इतर प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे.

दरम्यान या बैठकीला जिल्हा संपर्क – उपनेते अरुणभाई दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपनेत्या जान्हवी सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख श्री. शैलेश परब, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, जिल्हा समन्वयक बाळा गावडे ,उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार हे उपस्थित राहणार आहेत.

You cannot copy content of this page