Headlines

कणकवली पर्यटन महोत्सवाला शोभायात्रेने होणार प्रारंभ…

पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ; दिग्गज कलाकारांची अदाकारी..

⚡कणकवली ता.१०-: कणकवली पर्यटन महोत्सव 2024 या महोत्सवाचा प्रारंभ भव्य शोभा यात्रेने कणकवली पटकीदेवी येथुन विविध ढोलपथक, चित्ररथाच्या माध्यमातुन 11 जानेवारीला सायंकाळी 4 वाजता होणार आहे.
भव्य शोभायात्रा फूड फेस्टिवल आणि बच्चे कंपनीसाठी विविध मनोरंजनाची साधने यामुळे एक सांस्कृतिक वातावरण कणकवलीत तयार झाले आहे.

त्यानंतर या पर्यटन महोत्सवाचा उद्घाटन रात्री 9 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आ. नितेश राणे, माजी आ. प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या उपस्थितीत होणार आहे. या पर्यटन महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असुन त्याची पाहणी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व सहका-यांनी केली.

11जानेवारी रोजी या महोत्सवाचे उद्घाटन रात्री 9 वाजता करण्यात येणार आहे. तत्पूर्वी रात्री 8 वाजता शशांक कल्याणकर यांचा ‘रेट्रो टू मेट्रो’नामांकित ऑर्केस्ट्रा सुरू होणार आहे.

यावेळी हास्य कलाकार फु बाई फु फेम सागर करांडे, हेमांगी कवी यांची उपस्थिती असणार आहे. 12 जानेवारी रोजी स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. या निमित्ताने स्थानिक कलाकारांना व्यासपीठ दिले जाणार आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व सुहास वरूनकर व हरिभाऊ भिसे हे करणार आहेत. स्थानीक कलाकारांना यानिमित्ताने वाव मिळणार आहे. 13 जानेवारी रोजी इंडियन आयडॉलची टीम येणार आहे. 13 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. या कार्यक्रमाला इंडियन आयडॉल सायली कांबळे, आशिष कुलकर्णी व निहाल तवरो, यांच्या गाण्यांचा भव्य कार्यक्रम होणार आहे. तर समारोपादिवशी 14 जानेवारी रोजी महोत्सवाचा समारोप रात्री 9 वाजता केला जाणार आहे. तत्पूर्वी रोजी प्लेबॅक सिंगर दिव्य कुमार, नचिकेत लेले, चेतना भारद्वाज व संचिता गर्गे यांच्या गाण्यांचा भव्य कार्यक्रम होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह माजी खासदार निलेश राणे आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व भाजपचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कणकवली शहराला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांस्कृतिक नगरी अशी कणकवलीची ओळख आहे. त्यामुळे येथील संस्कृती तसेच परमहंस भालचंद्र महाराज, कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्यासारख्या महनीय व्यक्तींचे कार्य लोकांसमोर पोहचावे यासाठी या पर्यटन महोत्सवाचे आयोजन आम्ही करीत आहोत. त्यामाध्यमातून पर्यटन वाढीस लागल्यास शहराचा विकासही चांगल्या प्रकारे होणार आहे, असे माजी नगराध्यक्ष नलावडे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page