⚡मुंबई दि.०५-: भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. बीसीसीआयने अधिकृत १५ जणांचा संघ जाहीर केला आहे. संजू सॅमसन आणि युझवेंद्र चहल यांना डच्चू देण्यात आला असून अक्षर पटेलची वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात वर्णी लागली आहे. भारताच्या संघात ३ वेगवान गोलंदाज, ५ फलंदाज, ४ अष्टपैलू, एक फिरकीपटू आणि दोन यष्टीरक्षक फलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. आशिया कपसाठी असलेला संघच जवळपास वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार आहे.
भारताचे कर्णधार पद रोहित शर्माकडे असणाार आहे. तर हार्दिक पांड्या उपकर्णधार असणार आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्ययर, सूर्यकुमार यादव हे फलंदाज असतील. तर इशान किशन, केएल राहुल यष्टीरक्षक फलंदाज संघात आहे. हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल या अष्टपैलू खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे गोलंदाज संघात आहेत.
Squad: Rohit Sharma (Captain), Shubman Gill, Virat Kohli, Shreyas Iyer, Ishan Kishan, KL Rahul, Hardik Pandya (Vice-captain), Suryakumar Yadav, Ravindra Jadeja, Axar Patel, Shardul Thakur, Jasprit Bumrah, Mohd. Shami, Mohd. Siraj, Kuldeep Yadav
शुभमन गिल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर आणि श्रेयस अय्यर हे सहा खेळाडु पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहेत. भारतात ५ ऑक्टोबरपासून एकदिवसीय वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. यात पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारताची पहिलीच लढत ऑस्ट्रेलियाविरुद्ध असेल.
