शालेय शिक्षणमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मतदार संघात आठवडाभर कार्यक्रम…

केसरकर मित्रमंडळाची माहिती: सामाजिक उपक्रमाने होणार वाढदिवस साजरा…

⚡सावंतवाडी ता.१५-: आमदार दिपक केसरकर यांचा १८ जुलै रोजी होणारा वाढदिवसानिमित्त केसरकर मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक शैक्षणिक ,आरोग्यविषयक कृषी विषयक ,क्रीडाविषयक कार्यक्रमाचे आयोजन भव्यदिव्य स्वरूपात करण्यात आलेला आहे.सामाजिक गरज ओळखून विविध वस्तूंचे वितरण व कालावधीत करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख अशोक दळवी व माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली.

दरम्यान विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात विविध कार्यक्रम आठवडाभर राबवण्यात येणार असल्याचे देखील पोकळे यांनी यावेळी सांगितले.ते येथील केसरकर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

You cannot copy content of this page