मालवण राष्ट्रवादी शरद पवार यांच्या सोबत

तालुकाध्यक्ष डॉ विश्वास साठे यांनी भूमिका केली स्पष्ट

मालवण दि प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आमचे सर्वांचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादी पक्षात आहोत. यापुढेही त्यांच्याच नेतृत्वाखाली तसेच कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यरत राहणार आहोत. अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस मालवण तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे यांनी स्पष्ट केली आहे.

रविवारी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार व राष्ट्रवादी पक्षाकडून निवडून आलेल्या अन्य आठ आमदार यांनी भाजप शिवसेना सरकार मध्ये सहभागी होत मंत्री पदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर अनेक स्तरातून राष्ट्रवादी पदाधिकारी आपली भूमिका मांडत आहेत. मालवण राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष डॉ. साठे यांनी आपण पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सोबत असल्याचे सांगितले आहे. तर मालवण तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनीही सोबत असल्याचे सांगितले. अशी माहिती डॉ. साठे यांनी दिली.

फोटो : डॉ. विश्वास साठे

You cannot copy content of this page