सिलिका वाळू माफियांची एस आय टी मार्फत चौकशी करून मोक्का अंतर्गत कारवाई करावी

शिवसेना नेते अतुल रावराणे करणार मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वैभववाडीः जिल्ह्यातील सिलीका वाळू माफीयांकडून बनावट पास बनवून वाळूची तस्करी केली जात आहे.यामध्ये शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडविला जात असून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा होत आहे.या वाळू माफीयांची एस.आय.टी.मार्फत चौकशी करुन त्यांच्यावर मोकाअंतर्गत कारवाई करावी.अशी मागणी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करणार आहोत.अशी माहीती शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी दिली आहे. वैभववाडी शासकीय विश्रामगृहावर आयोजित पञकार परिषदेत रावराणे बोलत होते.यावेळी तालुकाप्रमुख मंगेश लोके, जिल्हा बॕंक संचालक दिगंबर पाटील, शिवसेना युवा सेना जिल्हा सरचिटणीस स्वप्निल धुरी आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना रावराणे पुढे म्हणाले, जिल्ह्यातील कासार्डे, पियाळी, आचिर्णे, लोरे, फोंडा, वाघेरी या परिसरातून सिलीका वाळूचे अनधिकृतपणे उत्खनन सुरु आहे.बनावट बारकोड, व शिक्के असलेले पास वापरुन करुळघाट, फोंडाघाट, भुईबावडा घाट मार्गातून वाळूची तस्करी केली जात आहे.यामध्ये शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडविला जात असून हा एक प्रकारे देशद्रोह आहे.काही वर्षापूर्वी तेलगीने केलेल्या स्टॕंम्प घोटाळ्याप्रमाणेच हा सिलिका वाळू घोटाळा जिल्ह्यात सुरु आहे.याबाबत प्रशासनाचे लक्षवेधूनही प्रशासन ठोस कारवाई करतांना दिसत नाही.यामागे या माफीयांच्या पाठीमागे राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप रावराणे यांनी केला आहे. खा.विनायक राऊत,पालकमंञी उदय सामंत, आमदार वैभव नाईक,जिल्हा बॕंक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर जि.प.सदस्य संजय आग्रे, यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या अनधिकृतपणे सुरु असलेल्या वाळू माफीयांवर कारवाई करावी.असे आदेश पालकमंञ्यांनी दिले आहेत.तरीही अदयाप म्हणावी तशी कारवाई झालेली नाही.वाळूचे ट्रक पकडून उपयोग नाही.तर या खाणी अधिकृत आहेत की नाही,त्यांना पर्यावरणाचा दाखला मिळाला आहे का ? सिंधुदूर्ग जिल्हा हा इकोसेंन्टीव्ह आहे.तिथेच राजरोस पर्यावरणाचा -हास केला जात आहे.पर्यटन जिल्ह्यात नेमके चालले आहे काय?यामध्ये अधिकारी डोळेझाक का करत आहेत? त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे?असा सवाल रावराणे यांनी केला. वाळू माफीयांकडून बनविण्यात येत असलेले बनावाट पास, त्यावर जिल्हाधिकारी, व मायनिंग अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के वापरुन हे पास तयार केले जात आहेत.आम्ही हे सर्व पुरावे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सादर करुन या वाळूची तस्करी करणाऱ्या वाळू माफीयांवर कारवाईची मागणी करणार आहोत.एस.आय.टी द्वारे आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यां मार्फत चौकशी करुन या माफीयांवर मोकातंर्गत कारवाई करावी.अशी मागणी आम्ही करणार आहोत.प्रसंगी न्यायालयात जाऊन या प्रकरणाचा फर्दापाश करणार असल्याचे रावराणे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page