घटनास्थळी पालिकेचा बंब बोलावून आग आटोक्यात
⚡सावंतवाडी ता.३०-: नारळाच्या झाडाने अचानक पेट घेतल्याची घटना उभाबाजार शिवाजी पुतळा परिसरात घडली. परिसरातील काहीनी नारळाच्या झाडाखाली आग घातली होती. ही आग भडकल्या उंच नारळाच्या सेंड्यातील सुक्या फोह्यांनी पेट घेतला.अचानक नारळाचे झाड पेटत असल्याचे दिसल्याने परिसरात एकच चर्चा झाली.
तात्काळ पालिकेच्या बंबाला पाचारण करत आग विझविण्यात आली.
सदर नारळाचे झाड भरवस्तीत असल्याने व आजून बाजूला घरे असल्याने बंब तिथपर्यंत पोहचू शकत नव्हता मात्र पाईपच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली.
