*💫बांदा दि.२४-:* पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या भाषण स्पर्धेत बांदा केंद्रशाळेचा विद्यार्थी नील नितिन बांदेकर याने जिल्हयात प्रथम क्रमांक मिळविला. विद्यार्थ्यांच्या सुप्तकलागुणांना वाव मिळावा यासाठी पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागामार्फत बालदिना निम्मित्ताने विविध प्रकारच्या आॉनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तालुकापातळीवर ‘मी चाचा नेहरू बोलतोय’ या विषयावरील भाषण स्पर्धेत नील बांदेकर याने तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला होता, व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती. जिल्हा स्तरावरही प्रथम क्रमांक प्राप्त होऊन राज्यस्तरावर या भाषणाची निवड झाली आहे. त्याचबरोबर प्रशालेची विद्यार्थीनी युक्ता दिपक बांदेकर हिने पत्रलेखन स्पर्धेत तालुक्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला असून या विद्यार्थ्यांना प्रशालेच्या मुख्याध्यापिका सरोज नाईक, उर्मिला मोर्ये, रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, रंगनाथ परब, जे. डी. पाटील, जागृती धुरी, वंदना शितोळे, प्राजक्ता पाटील, शितल गवस, लुईसा गोल्सालवीस व आई वडिलांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. नुकत्याच बांद्यात संपन्न झालेल्या शिवमहोत्सवात नील बांदेकर याचा माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर सरपंच अक्रम खान, बाळा आकेरकर, निलेश मोरजकर, विराज परब, राकेश परब आदि उपस्थित होते.
वक्तृत्व स्पर्धेत बांदा केंद्रशाळेचा नील बांदेकर जिल्ह्यात प्रथम…
