डंपर ला कारची पाठीमागून धडक

जिवीतहानी नाही;मात्र कारचे नुकसान

बांदा/प्रतिनिधी
दोडामार्ग येथून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या कारने बांदा कट्टा कॉर्नर चौकात डंपरला पाठीमागून धडक दिल्याने कारच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. तडजोडीने प्रकरण मिटविण्यात आल्याने याबाबत बांदा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नाही.
हा अपघात आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातग्रस्त कार दोडामार्ग येथून सावंतवाडीच्या दिशेने जात होती. त्याचवेळी डंपर गोव्यातून सावंतवाडीच्या दिशेने जात होता. कार चालकाने डंपरच्या पाठीमागील बाजूकडून धडक दिली. यात कारचे नुकसान झाले. आतील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातनंतर याठिकाणी गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.

You cannot copy content of this page