माजगावात उद्या आरोग्य शिबिराचे आयोजन

पडवे मेडिकल कॉलेज व माजगाव ग्रामपंचायत यांचा पुढाकार

⚡सावंतवाडी ता.१५-: एस एम पी एम मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे माजगाव सिंधुदुर्ग तसेच माजगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त उद्या सकाळी दहा ते दुपारी तीन या कालावधीत माजगाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर एक येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी या शिबिराचा लाभ ग्रामस्थानी घ्यावा असे आवाहन सरपंच सौ. अर्चना सावंत यांनी केले आहे.

या शिबिरामध्ये स्तनाचा कर्करोग डोळ्यांची तपासणी इसीजी तपासणी तोंडाचा कर्करोग तपासणी आधी तपासणी होणार आहे तरी जास्तीत जास्त ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा

You cannot copy content of this page