तहसीलदार अरुण उंडे: अर्चना घारे – परब यांचे केले कौतुक
सावंतवाडी : देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन मोठा अवधी गाठल्यानंतरही आजही महिलांना काही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे जरी असलं तरी त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रियांचा सहभाग आहे. अशावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून कौटुंबिक समस्या समुपदेशन कायदेशीर मदत व मार्गदर्शन केंद्राद्वारे महिलांना सक्षम करण्यासाठी अर्चना घारे-परब यांनी राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. अंगणवाडी सेविका हा एक समाजातील महिलांपर्यंत पोहोचण्याचा दुवा आहे. त्यामुळे या कार्यशाळेतून महिलांपर्यंत पोहोचण्याचा त्यांच सक्षमीकरण करण्याचा या मागील उद्देश साद्य होईल असं प्रतिपादन तहसीलदार अरुण उंडे यांनी बोलताना केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे अंगणवाडी सेविकांसाठी विधी संवाद सत्र व कार्यशाळेच आयोजन करण्यात आलं होतं. सावंतवाडीचे तहसीलदार अरूण उंडे यांच्या हस्ते या कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविकांनी कौटुंबिक समस्यांबाबत समुपदेशन, कायदेशीर मदत व मार्गदर्शन यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कायदेशीर सल्लागारांच्या माध्यमातून करण्यात आले. संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांसाठी या सेंटरच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली.
सावंतवाडीमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे अंगणवाडी सेविकांसाठी विधी संवाद सत्र व कार्यशाळेच आयोजन करण्यात आलं होतं. सावंतवाडीचे तहसीलदार अरूण उंडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून व दिपप्रज्वलनानं या कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी यशवंतराव चव्हाण सेंटर सिंधुदुर्गच्या संचालिका अर्चना घारे-परब यांनी प्रास्ताविक करताना म्हणाल्या, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे अंगणवाडी सेविकांसाठी विधी संवाद सत्र व कार्यशाळेच आयोजन आज करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात २० ठिकाणी ही कार्यशाळा पार पडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीत अंगणवाडी सेविकांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली. अंगणवाडी सेविका ह्या कष्टाळू व समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचतात. कोरोनासह अनेक स़ंकंटात त्या काम करत कष्टातून उभ्या राहिल्यात. गावातील प्रत्येक महिला, मुलांपर्यंत त्या पोहोचलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून विधी साक्षरता अभियान राबविण्यासाठी आज या कार्यशाळेच आयोजन करण्यात आल होत. कायद्याचं ज्ञान हे प्रत्येकाला असण गरजेच आहे. आपल्या परिसरात कौटुंबिक हिंसाचारा सारख्या घटना घडत असतात मात्र, त्या महिला पुढे येत नाहीत. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून त्या महिलांपर्यंत पोहोचणं त्या महिलांना यशवंतराव चव्हाण सेंटर पर्यंत पोहचवून त्यांच्या अडचणी सोडवण्यासह कायदेशीर सल्ला, पोलिसांची मदत ही यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून मिळवून दिली जाणार आहे. त्यासाठी हे अभियान राबविण्यात आले होते. याला चांगला प्रतिसाद याला मिळाला असुन नक्कीच अनेक केसेस ग्रामीण भागातून या ठिकाणी येतील व एखाद्याच कुटुंब उद्ध्वस्त होत असेल तर ते वाचविण्यासाठी या सर्वांचा सहकार्य मिळेल असं मत अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केले.
दरम्यान, अँड. आरती पवार, दर्शना बाबर देसाई, मंगल कामत, संध्या मोरे आदींचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे तहसीलदार अरूण उंडे, अर्चना घारे-परब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित
संध्या मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. अर्चान घारेंबद्दल केवळ ऐकलं होतं.आज प्रत्यक्षात त्यांचं कार्य पाहता आलं. कोरोना काळासह इतरही आपत्ती काळात आमच्या अंगणवाडी सेविकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले. आज कायदा विषयक समुपदेशनाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका विधी साक्षर होतील व याचा फायदा समाजात वावरताना होईल.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कायदेशीर सल्लागारानी उपस्थित अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन केले. स्त्री- पुरुष भेदभाव नाही म्हटलं तरी अजून शिल्लक आहे. या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून समानता, मुलभूत हक्कांची जाणीव महिलांना व्हावी या दृष्टीने कायदेशीर समुपदेशन व मार्गदर्शन केंद्राद्वारे केलं जातं आहे. स्त्रीयांना कौटुंबिक समस्यांबाबत समुपदेशन आमच्या माध्यमातून केल जात. ग्रामीण भागातील महिलांपर्यंत जाण्याचा अंगणवाडी सेविका हा एक दुवा आहे. ग्रामीण भागातील समस्याग्रस्त अशा महिलांना समुपदेशन केंद्राशी जोडण्यासाठी त्यांची मदत होईल असं मत अँड. सायली दुभाषी यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. तर अँड. सिद्धी परब म्हणाल्या, समाजातील प्रत्येक स्त्रीला कायद्याची माहिती असणं आवश्यक आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून स्त्रीयांवर अन्याय होत असल्यास आम्ही त्यांना न्याय मिळवून देतो. समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून महिला असल्यानं महिलांच्या भावना समजून घेण व त्यांना समजावण अधिक सोयीस्कर रित्या शक्य होत. महिलांना कोर्टाची पायरी चढयला न लावता समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांच्या अडचणीवर तोडगा निघावा यासाठी या केंद्राच्या माध्यमातून केल जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
अंगणवाडी सेविकांसोबत हळदीकुंकू समारंभान या कार्यशाळेचा समारोप झाला. उपस्थित अंगणवाडी सेविकांनी या उपक्रमाबद्दल अर्चना घारे-परब यांचे आभार मानत त्यांच्या कार्याच कौतुक केले. महिला म्हणून आपण करत असलेल्या कार्याचा अभिमान वाटतो अशा भावना अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, तहसीलदार अरूण उंडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, अँड. आरती पवार, महिला शहराध्यक्ष अँड. सायली दुभाषी, दर्शना बाबर-देसाई, संध्या मोरे, अँड. सिद्धी परब, युवती अध्यक्षा सावली पाटकर, रिद्धी परब, प्रिया परब, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, राकेश नेवगी, संतोष जोईल, नवल साटेलकर, प्रा. सचिन पाटकर, रामदास गवस, वैभव परब, बाबल्या दुभाषी, याकुब शेख आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सचिन पाटकर यांनी तर आभार पुंडलिक दळवी मानले.
