बांदा/प्रतिनिधी
रोटरॅक्त क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा, रोटरी क्लब ऑफ बांदा, डॉ. संदीप कल्याणकर फौंडेशन व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १५ रोजी सकाळी ९ ते १ यावेळी येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १ मध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गोवा जीएमसी रुग्णालयातील रक्तपेढीत सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठीच बांदा येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल १५१ रक्त पिशव्या संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी अक्षय मयेकर, बाबा काणेकर, संकेत वेंगुर्लेकर, निलेश मोरजकर, बाबली गवंडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्र शाळा नंबर १ येथे १५ रोजी महा रक्तदान शिबिर
