लोकसभेचा पुढील उमेदवार भाजपचाच

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रभाग समन्वयक संजय भेगडे

⚡सिंधुदुर्गनगरी ता १० -: लोकसभा उमेदवार कोण? हे भाजप पक्षाचे पार्लमेंटरी बोर्ड ठरवत असते. राज्यात बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युतीचे सरकार आहे. या रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असेल व कमळ चिन्हाचाच उमेदवार असेल अशी माहिती पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना लोकसभा प्रवास योजनेचे प्रभाग समन्वयक संजय ऊर्फ बाळासाहेब भेगडे यांनी सिंधूदुर्गनगरी येथील पत्रकार परिषदेत दिली.

लोकसभा प्रवास योजनेमध्ये महाराष्ट्रातील अठरा लोकसभा मतदारसंघांची निवड झाली आहे त्यात रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. याच पाश्र्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कामाला बळकटी देणे व सर्वसामान्य जनतेपर्यंत विविध योजना पोहोचण्यासाठी बाळासाहेब भेगडे यांचा सिंधुदुर्ग रत्नागिरी दौरा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गनगरी येथे प्रमुख भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक माध्यमिक पतपेढी सभागृहात आज (गुरूवारी) संपन्न झाली. तत्पूर्वी त्याने मुख्यालय पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी या समन्वय समितीचे साहाय्यक सयोजक माजी आमदार प्रमोद जठार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजप नेते अतुल काळसेकर , भाजप सरचिटणीस प्रभाकर सावंत , संजू परब ,बबलू सावंत, महेश सारंग, धनंजय पात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाने राज्य सरकार व केंद्र सरकार च्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनांच्या माध्यमातून सेवा दिली आहे. सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना राबविण्यात येतात .या योजनांचा आढावा घेणे नागरिकांशी संवाद साधणे व भारतीय जनता पक्षाची संघटना मजबूत करणे या उद्देशाने लोकसभा प्रवास योजनेत देशभरातील १६० लोकसभा मतदारसंघांची निवड झाली आहे. यात महाराष्ट्रातील १८ लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून त्यामध्ये रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्याच पार्श्वभूमीवरच आपला हा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा असून भाजप कार्यकर्ते जनता यांच्याशी संवाद साधणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.
केंद्रीय मंत्री तसेच राज्य सरकार व केंद्र सरकार याच्या माध्यमातून प्रत्येक भागात विविध विकासकामे व योजना राबविल्या जातात. सर्वसामान्य नागरिकांना याचा योग्य पध्दतीने लाभ मिळण्यासाठी संघटनात्मक पातळीवरही प्रयत्न होत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, भाजप नेते व केंद्रीय मंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा प्रवास योजनेची ही यात्रा राज्यात सुरू असून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी चांगल्यात चांगले काम करण्याचा प्रयत्न आहे. तसेच आगामी निवडणुकांपूर्वी भाजपचे वरिष्ठ नेते मंत्री महोदय यांच्या सभा राज्यभर होणार आहेत त्यांचे नियोजन करणे व कार्यक्रम ठरविणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे त्या अनुषंगाने विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे .असेही यावेळी बाळासाहेब भेगडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

You cannot copy content of this page