⚡मालवण ता.३१-: तुळशी विवाह निमित्त भाजपचे युवा कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने महिलांसाठी ” तुळस सजवा… आकर्षक बक्षीसे मिळवा ” ही आगळी वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यातील विजेत्या महिलेला मिक्सर ग्राईंडर तर उपविजेत्या महिलेला इंडक्शन कुकटॉप मिळणार आहे. याशिवाय या स्पर्धे दरम्यान विशेष पारितोषिक देखील ठेवण्यात आले आहे.
कोकणात व खास करून मालवणी मुलुखात तुळशी विवाहानिमित्त तुळस आकर्षकरित्या सजवली जाते. यासाठी महिला वर्ग विशेष परिश्रम घेतात. या कलेला वाव देण्यासाठी सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच तुळस रंगवा, बक्षीस मिळवा ही आगळी वेगळी स्पर्धा आयोजित केली आहे. यातील विजेत्या महिलेला मिक्सर ग्राईंडर तर उपविजेत्या महिलेला इंडक्शन कुकटॉप मिळणार आहे. याशिवाय या स्पर्धे दरम्यान विशेष पारितोषिक देखील ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संध्या परुळेकर 9421145801 किंवा चित्रा हरमळकर 9420191617 यांच्याकडे नावनोंदणी करावी, या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाने केले आहे.
