Headlines

कसाल येथे चीरेखान व्यावसायिकांची ३ रोजी महत्वाची बैठक

मालवण दि प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हातील सर्व चिरेखाण व्यावसायिकाची अत्यंत महत्वाची सभा गुरूवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता सिद्धीविनायक हाॅल, कसाल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे.तरी जिल्हातील सर्व चिरेखाण व्यावसायिकांनी या सभेला उपस्थित रहावे असे आवाहन श्री.संतोष गावडे यांनी केले आहे.

यावेळी राष्टीय हरित न्यायाधिकर खंडपीढ पूणे यांच्या १७ फेब्रुवारी २२ च्या आदेशाविरुध्द सर्वोच्य न्यायालयामध्ये अपिल करण्यात आले होते.त्या आदेशाला सर्वोच्य न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे.हि स्थगिती तात्पुरती स्वरुपात आहे.याबाबत विचार विनिमय करून पुढील रणनिती ठरविण्यासाठी व पुढे कोर्टीत बाजू माडण्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी हि सभा बोलविण्यात आलेली आहे.त्यांच प्रमाणे अल्प मुदतीचे परवाने दाखल करताना येणार्‍या अन्य अडचणी बाबत तसेच वाहतूक पासाबाबत आलेल्या नवीन नियमावली बाबत या सभेमध्ये चर्चा करण्यात येणार आहे.तरी सिंधुदुर्ग जिल्हातील सर्व चिरेखाण व्यावसायिकांनी या सभेला उपस्थित रहावे असे आवाहन श्री.गावडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page