*💫सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेले आडेली साळगाव माणगाव रस्त्यावरील संरक्षक भिंतीचे काम व मोरी दुरुस्तीच्या कामाची निविदा नव्याने काढण्यात येइल. असे लेखी आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिल्याने रूपेश बिडये यांनी जि,प.समोर सुरू केलेले साखळी उपोषण मागे घेतले. अध्यक्ष समिधा नाईक यांनी सरबत भरउन त्यांचे उपोषण सोडले. जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेले आडेली साळगाव माणगाव रस्त्यावर संरक्षण भिंत बांधणे व मोरी दुरुस्त करण्याचे काम तब्बल १० महिन्यांनी रद्द करावे लागणार असल्याचे स्वप्न पडणाऱ्या जिप बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता या भविष्यवाणी सांगणाऱ्या पोपटाप्रमाने पोपटपंची करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रुपेश बिडये यांनी केला . तसेच कार्यकारी अभियंता यांच्या मनमानी कारभाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी रुपेश बिडये यांच्यासह जिल्ह्यातील ठेकेदारांनी जिल्हा परिषद समोर आजपासून साखळी आंदोलन सुरू केले होते. आडेली झाराप साळगाव या रस्त्यावरील संरक्षक भींत जिल्हा नियोजनच्या २५ लाख रूपये निधीतून फेब्रूवारी २०२० मध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभागाने ई निविदा जाहिर केली होती. त्याची प्रक्रिया पूर्ण होवून १८ मार्च २०२० रोजी ठेकेदाराने कागदपत्रांची पूर्तता केली होती. तसेच यासाठी साडेतीन लाख रुपये अनामत रक्कम सुद्धा भरली होती. मात्र, नंतर कोरोना लॉकडाऊन झाल्याने या कामाचे कार्यारंभ आदेश झाले नव्हते. शासनाने आता कामांची स्थगिती उठविली आहे. तसेच कपात केलेला निधी १०० टक्के दिला आहे. त्यामुळे ठेकेदार याबाबत चौकशी करण्यास गेले असता ‘तांत्रिक कारणामुळे सबंधित काम रद्द करण्यात आल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. तर आता हे काम खासदार विनायक राऊत यांनी १५ जानेवारी २०२१ ला दिलेल्या पत्रानुसार रद्द करण्यात आले असल्याचे बांधकामच्या कार्यकारी अभियंता यांनी सांगितले. यावर कार्यकारी अभियंता यांना १० महिन्यांनी खासदार मंजूर झालेले काम रद्द करण्यासाठी पत्र देणार हे स्वप्न पडले होते का ? त्यासाठीच मंजूर काम रखडून ठेवले होते असा आरोप रुपेश बिडये यांनी यावेळी केला आहे. तसेच तांत्रिक मान्यता मिळालेले काम रद्द करता येते का ? कामाबाबत तांत्रिक अडचण होती तर निविदा प्रक्रिया का करण्यात आली ? असा प्रश्न उपस्थित करीत जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता वारंवार आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यासाठी असे डाव रचत आहेत. असा आरोप करत पोपटपंची करणाऱ्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या मनमानी कामाची चौकशी व्हावी, त्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात यावी, निविदा प्रक्रियेचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी रूपेश बिडये यांच्यासह जिल्ह्यातील ठेकेदारांनी जिल्हा परिषद समोर साखळी आंदोलन सुरू केले होते .यावेळी संतोष डीचोलकर, हेमंत फणसेकर, शंकर दामोदर, बबन तरापुरी, समीर हळदणकर आदी ठेकेदार या आंदोलनात सहभागी झाले होते याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी उपोषण कर्त्या भेट घेत त्यांना संबंधित काम रद्द होणार नाही या कामाच्या निविदा काढल्या जातील असे लेखी आश्वासन दिले व सरबत भरवून त्यांचे उपोषण सोडले.
“त्या” कामाची निविदा नव्याने काढण्यात येईल या लेखी आश्वासनानंतर रुपेश बिड्ये यांनी उपोषण सोडले
