स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आचरा रामेश्वर वाचन मंदिरात वक्तृत्व स्पर्धा

मालवण दि प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा तर्फे शुक्रवार दि.१२ ऑगस्ट रोजी दु ३ वाजता वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवीच्या मुलांसाठी संस्थेच्या कार्यकारिणी आणि सांस्कृतिक समितीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. यासाठी स्वातंत्र्य लढ्यातील १८९० ते १९४७ या काळातील स्वातंत्र्य सेनानी हा विषय असून स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. नाव नोंदणीचीअंतिम तारीख १० ऑगस्ट दुपारी एक वाजेपर्यंत असून अधिक माहिती साठी संस्थेच्या ग्रंथपाल सौ विनिता कांबळी ०२३६५२४६०१७ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत सांबारी व कार्यवाह अर्जुन बापर्डेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page