Headlines

लक्ष्मी नारायण बिबवणे विद्यालयाचा निकाल ९७.५० टक्के

हर्षाली बिबवणेकर प्रथम तर धनिषा जाधव द्वितीय

⚡कुडाळ ता.१७-: आज दहावीचा निकाल जाहीर झाला असून बिबवणे, येथील बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित लक्ष्मी नारायण विद्यालय, बिबवणेचा निकाल ९७.५०% लागला. विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांपैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यालयाची हर्षाली
वसंत बिबवणेकर हिने ९२.४०% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर धनिषा संतोष जाधव हिने ९१.६० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर तृतीय क्रमांक सिद्धाली रामचंद्र नाईक हिने ९०.२० टक्के गुण प्राप्त केले आहेत.


यशस्वी सर्व विद्यार्थाचे प्रशालेच्या वतीने संस्थाध्यक्ष सुंदर मेस्त्री, सचिव प्रकाश कुबल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक पारधी, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page