नेमळे विद्यालयाचा १०० टक्के निकाल

⚡सावंतवाडी ता.१७-: नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला.
या परीक्षेला एकूण ५० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. आर्यन अशोक चव्हाण याने ८८.२० टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला.

राजेंद्र आनंद मांजरेकर ८६.८० टक्के गुण मिळवून द्वितीय तर अनुराग रविंद्र वराडकर याने ८५.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ व प्राचार्य कल्पना बोवलेकर यांनी यशप्राप्त विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.

You cannot copy content of this page