⚡कणकवली ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे 9 जून ते 12 जून 2022 ला होणारे महाराष्ट्र राज्य भाजप प्रदेश महिला मोर्चाच्यावतीने आयोजित प्रशिक्षण व महिला कार्यकारणी पुढे ढकलण्यात आले आहे.
सदर कार्यकारणीला केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार,आमदार रवींद्र चव्हाण तसेच महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमताई खापरे इत्यादी दिगग्ज नेते उपस्थित राहणार होते परंतु देवेंद्र फडणवीस यांना झालेली कोरोनाची लागण ,सुधीरभाऊ यांच्या वडिलांचे झालेले निधन ,व सध्या राज्यात सुरू असलेली राज्यसभा व विधानपरिषद निवडणूक इत्यादी कारणास्तव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा कार्यक्रम तहकूब करण्यात आला असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली आहे