दिड वर्षीय मुलीचाही समावेश
*💫मालवण दि.२६-:* मालवण शहरात एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात पती-पत्नी व दीड वर्षीय मुलीचा समावेश आहे. मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने शनिवारी ७ व्यक्तींची कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात आली. यात ३ व्यक्ती पॉझिटिव्ह तर ४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. दरम्यान अन्य २२ जणांचे स्वाब घेण्यात आले असून ते आरटीपीसीआर तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अशी माहिती मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
