*💫सावंतवाडी दि.२-:* वडील आंघोळ करत असताना बादलीतील गरम पाणी बादलीवरती हात मारुन अंगावर ओतल्याने एक ४ वर्षीय मुलगा गंभीर भाजल्याची घटना आज सकाळी घडली आहे. जीत तुषार म्हाकले (रा. बाहेरचावाडा) असे या मुलाचे नाव असून त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सकाळी ९ वाजता दाखल दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून गोवा बांबुळी येथे त्याला अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले. हा मुलगा ५० टक्के भाजला असून त्याच्यावरती अधिक उपचार गोवा बांबुळी येथे चालू आहेत, अशी माहिती जिल्हा काँग्रेस सरचिटणीस तथा जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली आहे
गरम पाणी अंगावर ओतल्याने ४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी
