*💫कणकवली दि.२६-:* कणकवली तालुक्याचे माजी उपसभापती शांताराम ऊर्फ काका मोरजकर यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते ७५ वर्षांचे होते. अगदी ग्रामपंचायत सदस्य ते कणकवली तालुक्याचे उपसभापती म्हणून तर सेनेच्या काळात त्यांनी शाखा प्रमुख पासून १९९० सालापासून त्यांनी राजकारणात ठसा उमटविला होता.नारायण राव राणे यांचे ते विश्वासू होते.त्यांनी सेनेच्या काळात वीभाग प्रमुख पासून ते कणकवली तालुक्याचे तालुका प्रमुख तसेच कणकवली तालुक्याचे उपसभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांनी अल्प कालावधीत मनोहर नर्सरी नावाने उद्योजक म्हणूनही त्यांची ओळख होती.त्यांच्या पश्चात पत्नी भाऊ दोन भावजय पुतणे तिन विवाहीत मुलगे व विवाहित मुली एक सुना नातवंडे जावई असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून त्यांच्या चाहत्यांनी गर्दी दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.
माजी उपसभापती शांताराम ऊर्फ काका मोरजकर यांचे निधन
