ह्युमन राईट्स प्रदेश सह सचिव अमित वेंगुर्लेकर यांचा या प्रकरणाची चौकशी करण्याचा इशारा*
*💫सावंतवाडी दि.२५-:* सावंतवाडी मध्ये अजुन ही सावकारी पद्धत दिसून येत असून,ते दडबशाही करत करून गोरगरीब जनतेची फसवणूक करत आहेत.हे लोक गरजू लोकांना मदत म्हणून सुरवातीला एक बॉंड पेपरवर सही व दोन कोरे चेक घेतात. रक्कम देताना सुरुवातीला 10% व्याज दर महिना निश्चित करतात परंतु महिना अखेरची वेळ येऊ लागल्यावर त्यांना फोन करून धमकी देत 15% ते 20% पर्यंत दिलेल्या मुद्दलवर व्याज आकारणीची मागणी करत आहेत. अन्यथा ज्या व्यक्तीस मुद्दल व्याजाने दिली जाते त्या संबंधित व्यक्तीची मालकी हक्क मालमत्ता, संपत्ती तारण ठेवून अथवा जबरदस्तीने आपल्या नावावर करून घेत आहेत. तर तारण चेकवर पुन्हा मुद्दल रक्कम लिहून संबंधीत बँक खात्यात चेक जमा करून पुरेशी रक्कम नसल्याने त्या बँकेमार्फत परत कार्यवाही करून संबंधितास कोर्टाच्या पायऱ्या झिजवत ठेवले जात आहे. अशी बरीच वर्षे कृत्य सुरू असून काही दिवसातच या प्रकरणाची योग्य ती चौकशी व्हावी यासाठी ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन ट्रस्ट तर्फे योग्यरीत्या शासकीय कार्यालयात पुराव्यासह अर्ज दाखल केला जाणार असल्याची माहिती ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन ट्रस्ट प्रदेश सह सचिव अमित वेंगुर्लेकर यांनी दिली आहे.
