कारीवडे ग्रामस्थानी बांधकाम विभागासमोर छेडले आंदोलन

आमदार दीपक केसरकर यांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आले

*⚡सावंतवाडी ता.१५-:* कारिवडे येथील गवळणीचा वहाळ व पेडवेवाडी स्टॉप येथे गतिरोधक, दिशादर्शक फलक, पांढऱ्या रंगाचे पट्टे, व रात्रीच्या वेळी लाईट पडल्यावर चकाकणारे रेडियम बोर्ड लावण्यात यावेत. तसेच त्या भागात गतिरोधक बसवण्यात यावेत. यासाठी गेली २५ वर्ष ग्रामपंचायतीचे ठराव सरपंच बांधकाम विभागाला पाठवत असून, त्यावर योग्य कारवाई होत नसल्याने आज गावातील काही प्रमुख व्यक्तीच्या उपस्थितीत बांधकाम विभाग समोर लाक्षणिक आंदोलन सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले होते. यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी मध्यस्ती करत आंदोलन स्थळी भेट देऊन त्याच्या मागण्या पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले. तसेच त्यासाठी आमदार निधीतून निधी देण्याचे देखील आश्वासन दिले आहे. यावेळी त्यांनी बांधकाम च्या प्रभारी अभियंता संगीता चव्हाण यांना आदेश देत लेखी आश्वासन देण्यास सांगितले आहे. येत्या एक महिन्याच्या आत ग्रामस्थांनी केलेल्या सर्व मागण्या पूर्ण करण्यात येतील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page