यासाठी कुडाळ शिवसेना सरपंच संघटना करणार उपोषण

सिंधुदुर्गनगरी ता २८ प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रपत्र ड लाभार्थी यादीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे १६ हजार लाभार्थी केंद्र शासनाच्या चुकीच्या निकषामुळे अपात्र ठरले आहेत. सदर अपात्र यादीतील गरजू गरीब कुटुंबांना यादी मध्ये स्थान मिळणे त्यांच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. तरी याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार ८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना सरपंच उपसरपंच संघटना कुडाळ यांच्यावतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या बाबतचे निवेदन आज जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले. यावेळी कुंदे सरपंच सचिन कदम, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, नेरूर सरपंच शेखर गावडे, हुमरस सरपंच अनुप नाईक, पावशी उपसरपंच दीपक आंगणे, उपस्थित होते.

You cannot copy content of this page