विजयराव नाईक बी .फार्मसी महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा १०० % निकाल

*⚡कणकवली ता.१६-:* युवक कल्याण संघ संचलित , विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल महाविद्यालयाचा डॉ . बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी मार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेचा प्रथम वर्ष सत्र 2 बी . फार्मसीचा निकाल १०० टक्के लागला आहे . या परीक्षेमध्ये भक्ती वायंगणकर ( ९ .८६ SGPA ) गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे , तसेच ०५ विद्यार्थ्यांनी ( ९ .७२ SGPA ) गुण मिळवून द्वितीय क्रमांक व १२ विद्यार्थ्यांनी ( ९ .६६ SGPA ) गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे . तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा . आ . श्री . वैभव नाईक , उपाध्यक्षा सौ . स्नेहा नाईक , सचिव डॉ . रमण बाणे , खजिनदार श्री . मंदार सावंत , प्राचार्य पुजा पटेल , बी . फार्मसी विभाग प्रमुख प्रा . अमर कुलकर्णी व डी . फार्मसी विभाग प्रमुख प्रा . चंद्रशेखर बाबर , प्रा . मेघा बाणे , प्रा . ऋषीकेश काटकर , प्रा . श्वेता पाटील , प्रा . निशा करंदीकर , प्रा . नमिता सागवेकर , प्रा . प्रणिता चव्हाण व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले .

You cannot copy content of this page