आयुष्यमान भारत योजनेचे कणकवलीत केले पं.स. मतदारसंघनिहाय नियोजन

नागरिकांनी लाभ घेण्याचे सभापती मनोज रावराणे यांचे आवाहन

*⚡कणकवली ता.१६-:* कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून केंद्रशासनाच्या आयुष्यमान भारत योजनेच्या पात्र लाभार्थींचे रजीस्ट्रेशन करण्यासाठी व त्यांना त्याचा लाभ स्थानिक पातळीवरच लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी पं. स. मतदार संघनिहाय गावांचे नियोजन पं. स. सभापती मनोज रावराणे यांनी केलेले आहे. यामुळे गावातील पात्र लाभार्थींना सदरचे रजिस्ट्रेशन गावातच किंवा नजीकच्या गावात करणे शक्य होणार आहे. यासाठी संबंधित ग्रामपंचायतीने आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन सभापती मनोज रावराणे यांनी केले आहे. ज्यामुळे गावातील गरजू गरीब लोकांना याचा आजारपणासाठी भविष्यात लाभ मिळणार आहे. याबाबत ग्रामिण जनतेला सहकार्य करणेच्या सुचना संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांना तालुकास्तरावरून देण्यात आल्या आहेत. हे नियोजन खालीलप्रमाणे आहे. १) लोरे नं. १ :- लोरे नं.१, घोणसरी, वाघेरी, पियाळी ग्रा. पं. घोणसरी,ग्रा. पं. लोरे :. १७ ऑक्टोबर, २०२१ २) वरवडे :- वरवडे, पिसेकामते, ग्रा. पं. वरवडे : १८ ऑक्टोबर, २०२१ ३) कलमठ :- कलमठ, सातरल, कासरल ग्रा. पं. आशिये १८ ऑक्टोबर, २०२१ ४) तरळे :- तरळे, वारंगांव, शिडवणे, कुरंगवणे, साळीस्ते ग्रा. पं. तरळे १९ ऑक्टोबर, २०२१ ५) खारेपाटण :- खारेपाटण, नडगीवे, शेर्पे, चिंचवली, वायंगणी, नोंदणी करण्याचे ठिकाण :- ग्रा. पं. खारेपाटण,१९ ऑक्टोबर, २०२१ ६) नांदगांव :- नांदगांव, तोंडवली, असलदे, कोळोशी, नोंदणी करण्याचे ठिकाण :- ग्रा. पं. नांदगांव, २० ऑक्टोबर ते ऑक्टोबर २०२१ ७) कासार्डे :- कासार्डे, ओझरम, दारूम, नोंदणी करण्याचे ठिकाण : ग्रा. पं. कासार्डे, २० ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर, २०२१ ८) कळसुली :- कळसुली, शिरवल, हळवल, कसवण, तळवडे, नोंदणी करण्याचे ठिकाण :- ग्रा. पं. कळसुली, २३ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर, २०२१ ९) ओसरगांव :- वागदे, ओसरगांव, बोर्डवे, नोंदणी करण्याचे ठिकाण :- ओसरगांव महिला भवन, २३ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर, २०२१ नांदगांव :- आयनल ग्रा. पं. आयनल. २३ ऑक्टोबर, २०२१ १०) नाटळ :- सांगवे, नाटळ, कुंभवडे, नोंदणी करण्याचे ठिकाण :- ग्रा. पं. सांगवे, २५ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर, २०२१ ११) नरडवे :- नरडवे, दिगवळे, दारीस्ते, शिवडांव, नोंदणी करण्याचे ठिकाण :- ग्रा. पं. नरडवे, ग्रा. पं. शिवडांव, २५ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर, २०२१ १२) फोंडा :- फोंडाघाट ग्रा. पं. फोंडाघाट दि. २५ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर, २०२१ १३) हरकुळ :- बु. हरकुळ बु, नागवे, करंजे , नोंदणी करण्याचे ठिकाण : ग्रा. पं. हरकुळ बु. दि. २८ ऑक्टोबर ते दि. २९ ऑक्टोबर, २०२१ १४) हरकुळ खु. :- हरकुळ खु, कोंडये, डामरे, गांधीनगर, भिरंवडे, करूळ, नोंदणी करण्याचे ठिकाण :- ग्रा. पं. डामरे, दि. २८ ऑक्टोबर ते दि. २९ ऑक्टोबर, २०२१ १५) जानवली :- जानवली, हुमरठ, साकेडी, तिवरे, बेळणे खु., नोंदणी करण्याचे ठिकाण :- ग्रा. पं. जानवली दि. ३० ऑक्टोबर ते दि. ३१ ऑक्टोबर, २०२१ १६) बिडवाडी :- बिडवाडी, सावडांव, ओटव, माईण, भरणी, तरंदळे, नोंदणी करण्याचे ठिकाण :- ग्रा. पं. सावडांव दि. ३० ऑक्टोबर ते दि. ३१ ऑक्टोबर, २०२१.

You cannot copy content of this page