*⚡कणकवली ता.१५-:* “शासन व विद्यापीठासोबत महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक,कर्मचारी या सर्वांनी संयुक्त प्रयत्न केले तरच महाविद्यालय पुढे जावू शकते. सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून कार्य केले पाहिजे, भविष्यात काही अडचणी निर्माण झाल्यास शासन आपल्या स्तरावर सर्वतोपरी मदत करेल” असे उच्च शिक्षण कोकण विभाग पनवेलचे विभागीय सहसंचालक डॉ. संजय जगताप यांनी तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात नुकत्याच आयोजित आढावा बैठकित ते बोलत होते. महाविद्यालयातील विविध पदांची, कोर्सेसची माहिती संकलित करून शासनास या बद्दलचा अहवाल सादर करण्यात येणार आहे, दर्जेदार शिक्षण, नाविन्यपूर्ण सामाजीक उपक्रमा मूळे अल्पावधीतच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दळवी महाविद्यालयाचे नाव झाले आहे, श्री. दळवींनी स्वतः क्रीडा संकुलासाठी चार एकर जागा दिली आहे. असे पुढे बोलतांना ते म्हणाले. यावेळी आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रमाची सुरुवात श्री.विनायक दळवी यांनी लीपीबद्ध केलेले महाविद्यालय गीत श्री.ओंकार बर्वे यांनी गावून केली. श्री.हेमंत महाडिक यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले, “दळवी महाविद्यालय डॉ. संजय जगताप सरांनी केलेल्या सूचने प्रमाणे मार्गक्रमण करेल” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाविद्यालयाची विकासगाथा पीपीटी च्या साह्याने कु.साक्षी भोगटे हिने दाखवली. तर सूत्रसंचालन कु.दिक्षा सुतार हिने केले. या वेळी मुंबई विद्यापीठ अभियंता श्री. विनोद पाटील, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॉडेल डिग्री कॉलेज,आंबडवे ता.मंडनगडचे, समन्वयक, डॉ.साळुंके, सहाय्यक प्राध्यापक अंशुमन मगर तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, व विद्यार्थी उपस्थित होते. कोविड-19 च्या नियमांचे पालन करून ही आढावा बैठक संपन्न झाली.
महाविद्यालय पुढे नेण्यासाठी सर्वांनी संयुक्त प्रयत्न केले पाहिजेत :डॉ.संजय जगताप
