स्ट्रक्चरल ऑडिट करून पूल योग्य असल्यास ​साकव उभारणी करा

पालकमंत्री उदय सामंत यांनी मल्हार पुलाच्या नुकसानीच्या ठिकाणी भेट देत घेतला आढावा

*💫कणकवली दि.२६-:* कनेडी​- नाटळ मार्गावर असलेल्या मल्हार पुलाच्या कोसळलेल्या पुलाच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करत स्ट्रक्चरल ऑडिट करून पूल योग्य असल्यास ​साकव उभारणी करण्या​च्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला दिल्या. कणकवली तालुक्यातील कनेडी​- नाटळ मार्गावर असलेल्या मल्हार पुलाच्या नुकसानीची पालकमंत्री उदय सामंत व शिवसेना नेत्यांनी आज पहाणी केली. .यावेळी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, नगरसेवक अबीद नाईक, बाळा भिसे, सचिन सावंत, अँड.हर्षद गावडे, बेनी डीसोजा, डिवाय एसपी नितीन कटेकर, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला, तहसीलदार रमेश पवार , बीडीओ अरुण चव्हाण, उपअभियंता के​.​ के​.​ प्रभू हेमंत सावंत, संतोष सावंत, आदी उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे मल्हार पूल पुराच्या तडाख्याने कोसळल्याने या ठिकाणच्या पाचहुन अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देत आढावा घेतला. कोणत्या स्थितीत या पुलाचे काम केले जाणार असून ग्रामस्थांची वेळ होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. पुलासाठीच्या पर्यायी सोयीसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल असे सांगतानाच कार्यकारी अभियंता शेवाळे यांना आवश्यकत्या सूचना नाम. उदय सामंत यांनी दिल्या। यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत त्याचप्रमाणे शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांनी याबाबतच्या विविध सूचना मांडल्या त्याचप्रमाणे ग्रामस्थाने निवेदन देत आपले प्रश्न पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मांडले.

You cannot copy content of this page