सांगवे – कनेडी भाजपा कार्यालयात सामाजिक उपक्रम

आम.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित काजू कलमे आणि छत्र्यांचे वाटप

*💫कणकवली दि.२३-:* आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगवे कनेडी बाजारपेठेतील भाजपा विभागीय कार्यालयात जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत व माजी जिल्हा परीषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या मार्फत मोफत काजू कलमे, छत्री व जिलेबी वाटपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नाटळ सांगवे पंचक्रोशीतील ग्रामस्थांना गरजेप्रमाणे २५०० काजू रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच ४००० छत्री वाटप उपक्रमाची प्रातिनिधिक सुरवात करण्यात आली. येत्या काही दिवसात नाटळ – सांगवे पंचक्रोशीतील ग्रामस्थांना या छत्र्या प्रत्येक घरात घरपोच मिळणार आहेत. यावेळी सर्व उपस्थित ग्रामस्थांना, कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना जिलेबी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास विजय भोगटे, सुरेश सावंत, बाबू सावंत, प्रफुल काणेकर, पंचक्रोशीतील गावांचे सरपंच, उपसरपंच, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page