Headlines

भटवाडी महापुरुष परिसर येथे कृषी दिनानिमित्त लावले वडाचे झाड…

  महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण..

*⚡सावंतवाडी ता.०१-:* भटवाडी महापुरुष परिसर येथे कृषीदिनाचे औचित्य साधून महिला बालकल्याण सभापती दिपाली दिलीप  भालेकर यांच्या हस्ते वटवृक्षाचे झाड लावण्यात आले हॆ झाड सभापती दिपाली भालेकर यांनी आपल्या घरी गेली चार वर्ष छान कुंडीत लावून त्याचे जतन केले होते आणि आज कृषिदिनानिमित्त आपल्या महिलासाठी सार्वजनिक ठिकाणी ते लोकार्पण केले आहे.
भविष्यात  आसपासच्या महिला भगिनींना वटवृक्षाची पूजा करण्यास लांब जावे लागणार नाही हा उद्देश ठेऊन हॆ झाड लावण्यात आले आहे.
झाड लावताना सर्व महिला भगिनी आनंदित झाल्या होत्या. 
यावेळी महिला बालकल्याण सभापती सौ.दिपाली भालेकर, सौ,अनुजा पिंगुळकर, सौ.सुनीता कुडाळकर,सौ.दीपा गावडे,सौ.नम्रता कदम, सौ.रूपाली सुभेदार. सौ,आरती सुभेदार,सौ.रामेश्वरी सुभेदार, सौ.अंकिता सुभेदार, सौ.उमिका गावडे, सौ.संगीता सुभेदार, सौ.रेखा कांडरकर आदी महिला भगिनी उपस्थित होत्या.
You cannot copy content of this page