आडेली “महिला सरपंचा” यशस्वी कोंडसकर यांच्यामार्फत आंबेडकरनगर येथील सोशल मीडियावरील वृत्ताची “भांडाफोड”…

नजिकच्या सार्वजनिक विहिरीचे काम पूर्ण करण्याच्या ठेकेदारास “सक्त सूचना”..

⚡वेंगुर्ला ता.०४-: तालुक्यातील आडेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या आडेली आंबेडकरनगर येथे जुन्या सार्वजनिक विहिरीत पाणी उपलब्धता असूनही दोन दिवसापूर्वी काही “सोशल मीडिया” च्या माध्यमातून आडेली आंबेडकरनगर येथे तीव्र पाणीटंचाईबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. दरम्यान आडेली ग्रामपंचायतच्या “महिला सरपंचा” यशस्वी कोंडसकर यांनी सकाळीच 6.30 वा. स्वतः आडेली आंबेडकरनगर येथे विहिरीची पाहणी केली असता नागरिक व महिला पाण्याचा योग्य प्रकारे उपयोग करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित वृत्त प्रसिद्ध करणाऱ्या त्या “तीन” सोशल मिडीयाची आडेली ग्रामपंचायत सरपंचा यशस्वी कोंडसकर यांनी स्वतः लक्ष घालून भांडाफोड केल्याने सुज्ञ नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. जुन्या विहिरीवरून
नागरिकांना रहाटाद्वारे पाणी उपलब्ध असताना जनतेसमोर चुकीची माहिती दिली गेली होती. त्यामुळे स्वतः महिला सरपंच यशस्वी विष्णू कोंडसकर यांनी लक्ष घालून आडेली आंबेडकरनगर येथे भेट दिली असता स्थानिकांना जुन्या विहिरीद्वारे पाणी उपलब्ध असल्याची वस्तूस्थिती निदर्शनास आली. त्यामुळे संबंधित सोशल मीडिया वृत्ताची भांडाफोड करण्यात यश आले आहे. दरम्यान शासनामार्फत दुसऱ्या सार्वजनिक विहिरीचे उर्वरित काम करण्यात येत असून संबंधित ठेकेदारास उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या व चांगल्या दर्जाचे काम करण्याच्या “सक्त सूचना” देण्यात आल्या असल्याची माहिती सरपंचा यशस्वी कोंडसकर यांनी दिली. आडेली गावातील नागरिकांचे व महिलांचे प्रश्न सोडविणे, यासाठी पुढील कालावधीतही जनतेच्या सेवेत तत्पर राहणार असल्याची माहिती महिला सरपंचा यशस्वी कोंडसकर यांनी दिली.

You cannot copy content of this page