पद्मश्री राणी बंग:पद्मश्री राणी बंग यांचे आशा स्वयंसेविकांना ऑनलाईन मार्गदर्शन :बॅ नाथ पै फाउंडेशन आणि बॅ नाथ नर्सिंग कॉलेजचा उपक्रम..
कुडाळ : गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे महिलांतील प्रमाण पाहता ‘ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस’ (HPV )लस अतिशय उपयुक्त व सुरक्षित आहे. महिलांच्या विवाहपूर्व वयात म्हणजे वय वर्ष 9 ते 14 वर्षा पर्यंतच्या मुलींसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण, उपयुक्त व सुरक्षित लस आहे. त्याचा या वयोगटातील महिलानी अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन पद्मश्री डॉक्टर राणी बंग यांनी केले. बॅरिस्टर नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट तर्फे आणि बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व रिसर्च सेंटर नेरूर येथे आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानामध्ये कुडाळ तालुक्यातील आशा स्वयंसेविकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. एकूण 142आशा स्वयंसेवक महिलांनी लाभ घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिफारशीनुसार देशभरात महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त एचआयव्ही लसीकरणाचा मोफत राष्ट्रीय कार्यक्रम जाहीर केला आहे .या कार्यक्रमांतर्गत 9 ते 14 वर्षाच्या मुलींना सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून त्यांचे लसीकरण करण्यात येणार असून गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालय,बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट कुडाळ आणि सोमा हेल्थ यांच्या सहकार्याने सर्च संस्थेच्या संचालिका पद्मश्री डॉ. राणी बंग यांचे कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरुर येथे एक विशेषऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या व्याख्यानामध्ये आरोग्य क्षेत्रातील व्यवसायिकांना सध्या महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या स्तन व गर्भाशय मुख आणि इतर कर्करोगाविषयी (योनी गुदद्वार, घसा इ.) प्रतिबंध, निदान आणि उपचार या संदर्भात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दुपारी 3.30 ते 5.00 या वेळेत कुडाळ तालुक्यातील आशा स्वयंसेविकाना कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरुर येथे ऑनलाईन च्या माध्यमातून महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
गर्भाशयाच्या मुखातील कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्यासंदर्भातली खबरदारी घेणे व जनजागृती करण्याच्या उद्देशाने अशा स्वयंसेवीकडे मार्गदर्शन करताना ह्युमन पॅपीलोमा व्हायरस (HPV)ही लस किती उपयुक्त आहे हे ध्वनी चित्रफिती दाखवून मार्गदर्शन केले. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजाला आरोग्य विषयक जनजागृती करणाऱ्या म्हणून डॉक्टर राणी बंग व अभय बंग हे सुप्रसिद्ध आहेत. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने त्या कॅन्सर विरोधी Hpv लसीच्या वापराबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी तीन ते पाच या वेळेत ऑनलाईन उपलब्ध होत्या. यासंदर्भात अशा स्वयंसेविकांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तर दिली. ही लस सुरक्षित आहे का? तिचे दुष्परिणाम कोणते? कोणत्या वयोगटामध्येही वापरणे जास्त उपयुक्त ठरते? यासाठी कोणती पथ्य पाळली जातात. लस कोणत्या पद्धतीने घेतली जाते? या लसीमुळे इतर विषाणूंचा संसर्ग होतो का? याबाबत योग्य मार्गदर्शन करत ही कोणत्याही प्रकारच्या दुष्परिणाम पासून मुक्त असल्याचे आवर्जून नमूद करून या कार्यक्रमाच्या योग्य आयोजनाबद्दल आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बॅरिस्टर नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा अदिती पै ह्या ऑनलाइन उपस्थित होत्या. त्याच बरोबर बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी, बॅ.नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रत्युष रंजन बिस्वाल,प्रा. वैशाली ओटवणेकर, प्रा. प्रथमेश हरमलकर डॉ. राजेश कापसे इत्यादी उपस्थित होते .
