शिंदे शिवसेनेच्या वतीने आयोजित महिला दिनानिमित्त कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

कर्तृत्ववान महिलांचा सत्कार:डॉ. भक्ती सावेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित..

⚡सावंतवाडी ता.-: आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने शिवसेना महिला आघाडीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. समाजातील महिलांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पहिल्या महिला रिक्षाचालक म्हणून ओळख असलेल्या प्रज्ञा पांचाळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

तसेच १०० हून अधिक गडकिल्ले सर करणारी साहसी महिला नुपूर अक्षय मठकर हिचाही गौरव करण्यात आला.

याचबरोबर कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळवलेल्या कुणाल गाड यांच्या मातोश्री सौ. संतोषी संजू गाड यांचा देखील सन्मान करण्यात आला. तसेच सावंतवाडी स्मशानभूमीत पतीच्या खांद्याला खांदा लावून प्रेतदहनाचे कार्य करणाऱ्या सौ. सुजल निरवडेकर यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात एकूण १५ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. समाजात महिलांनी केलेल्या कार्यामुळे इतर महिलांनाही प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. भक्ती सावेत उपस्थित होत्या. तसेच शिवसेना महिला जिल्हा प्रमुख ॲड. निता सावंत, नवनिर्वाचित नगरसेविका सौ. धारगळकर दुभाषी व नेहा नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाला शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page