⚡दोडामार्ग ता.१६-: तालुक्यातील पिकुळे शेळपीवाडी येथे शनिवार, दि. १७ जानेवारी २०२६ रोजी कुलदेवतेजवळ आरोलकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, आरवली यांचा भव्य आणि बहुप्रतिक्षित नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे. या नाट्यप्रयोगामुळे परिसरातील ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नाट्यरसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पारंपरिक दशावतार लोककलेची समृद्ध परंपरा जपणारे आरोलकर नाट्यमंडळ आपल्या दमदार अभिनयशैली, सुमधुर गायन, पारंपरिक वेशभूषा आणि भव्य नेपथ्यामुळे नाट्यरसिकांमध्ये विशेष ओळख निर्माण करून आहे. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या या लोककलेचे जतन व संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हे नाट्यमंडळ सातत्याने करत आहे.
या नाट्यप्रयोगाचे आयोजन पिकुळे शेळपीवाडी ग्रामस्थ तसेच महालक्ष्मी बचत गट, शेळपीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. पारंपरिक लोककलेचा आनंद घेण्यासाठी आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
पिकुळे शेळपीवाडी येथे १७ जानेवारीला आरोलकर दशावतार नाट्यमंडळाचा भव्य नाट्यप्रयोग…
