वेदिका परब यांची स्वातंत्र्यवीर सावरकर कलादालनास भेट देत प्रशंसा..
⚡वेंगुर्ला ता.१३-: ” इट्स अ सुपिरियर…. इट्स अ ग्रेट वर्क…. ” अशा शब्दात आज मंगळवारी रोजी सौ.वेदिका विशाल परब यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या “स्वातंत्र्यवीर सावरकर कलादालन” च्या पाहणी प्रसंगी उदगार काढले.
वेंगुर्ला उपनगराध्यक्ष व दोन स्वीकृत नगरसेवक यांची आज निवड प्रक्रिया संपन्न झाली. यावेळी भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ला येथे भेट देत नूतन पदाधिकारी यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेने विकसित केलेल्या
“स्वातंत्र्यवीर सावरकर कलादालन” यास भेट देऊन पाहणी केली व माहिती घेतली. यावेळी वेदिका परब, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक सचिन शेट्ये, युवराज जाधव, प्रणव वायंगणकर, प्रितम सावंत, सुधीर पालयेकर, सदानंद गिरप, विजय रेडकर, संदीप देसाई, साईप्रसाद भोई आदीसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी दिलीप गिरप, सुहास गवंडळकर यांनी कलादालन बाबत विशाल परब, वेदिका परब यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी वेदिका परब यांनी कलादालन कलात्मकरित्या साकारण्यात आले असून वेंगुर्ला शहराचे सौंदर्य व पर्यटन निश्चितच वाढले आहे. नगराध्यक्ष आणि मागील टीमचा यात मोठे योगदान आहे. यापुढील पाच वर्षात दिलीप गिरप यांनी शहर विकासात आणखी मोठे योगदान द्यावे, असे सूचित केले.
