बाहेरील भाजी विक्रेत्यांविरोधात स्थानिक भाजी विक्रेते आक्रमक…

नगराध्यक्षांसह, मुख्याधिकाऱ्यांनी दखल घेण्याची केली मागणी: तर स्थानिक विक्रेत्यांवर अन्य होणार नाही ,नगरसेवक अजय गोंदावळे यांचा शब्द..

⚡सावंतवाडी ता.११- :
सावंतवाडी शहरात बाहेरून येऊन भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमुळे स्थानिक भाजी विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करत आज स्थानिक विक्रेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शिरोडानाका परिसरात ही घटना घडली असून संबंधित बाहेरील भाजी विक्रेत्यांना तात्काळ उठवण्यात आले.

स्थानिक भाजी विक्रेत्यांनी सांगितले की, आम्ही नियमितपणे नगरपालिकेला भाडे भरतो, परंतु बाहेरून येणारे विक्रेते शहरातील विविध ठिकाणी बेकायदेशीररीत्या बसून भाजी विक्री करत असल्यामुळे आमच्याकडे ग्राहक येत नाहीत. यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
या संदर्भात अनेक वेळा नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याने आज आम्हाला स्वतःहून पाऊल उचलावे लागले, असेही विक्रेत्यांनी स्पष्ट केले.

यापुढे बाहेरून येणारे भाजी विक्रेते शहरातील कोणत्याही ठिकाणी बसून विक्री करताना आढळून आल्यास आम्ही अधिक तीव्र आंदोलन करण्यास मजबूर होऊ, असा इशाराही स्थानिक भाजी विक्रेत्यांनी दिला आहे.
नगरपरिषदेने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन स्थानिक भाजी विक्रेत्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी नगरसेवक अजय गोंदावळे यांनी देखील घटनास्थळी जात पाहणी करत संबंधितांना काढण्याच्या आदेश दिले तसेच यापुढे स्थानिकांवर कुठला ही अन्य होणार नाही याची आपण दखल घेऊ असा अजय गोंदावळे यांनी स्थानिकांना दिला आहे.

You cannot copy content of this page