⚡कणकवली ता.०९-: महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवार, दिनांक २१० जानेवारी २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्या दरम्यान विविध धार्मिक, विकासात्मक तसेच प्रशासकीय कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे –
सकाळी ७ वा. सुवर्णगड, मुंबईहून सांताक्रूझ विमानतळावरून जेट एअरक्राफ्टने गोव्याकडे रवाना होणार असून, सकाळी ८.३० वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा (गोवा) येथे आगमन होईल. त्यानंतर मोटारीने सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे प्रयाण करणार आहेत.
सकाळी १०.१५ वाजता पालकमंत्री चषक २०२६ अंतर्गत तालुकास्तरीय भजन स्पर्धेच्या उद्घाटनास ते उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम भगवती मंगल कार्यालय, कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे.
यानंतर सकाळी ११ वाजता मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी वार्षिक जत्रोत्सव २०२६ तसेच देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील श्री देव स्वयंभू देवाचा वार्षिक जत्रोत्सव २०२६ संदर्भातील आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे होणार आहेत.
दुपारी १२ वाजता राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शिवसृष्टी व पर्यटनपूरक सुविधा उभारणीसंदर्भात जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सन २०२५-२०२६ अंतर्गत जिल्हा परिषदेकडील विविध कामांचे भूमिपूजन, उद्घाटन तसेच लाभार्थ्यांना लाभवाटप व सन्मान सोहळा इच्छापूर्ती मंगल कार्यालय, ओरोस येथे संपन्न होणार आहे. संध्याकाळी पालकमंत्री ना. नितेश राणे गोवा मार्गे मुंबईकडे रवाना होणार आहेत.
