⚡सावंतवाडी ता.०४-: मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवार कार्यकारिणी मंडळ व निमंत्रित माजी विद्यार्थी यांची संयुक्त सभा रविवार ०७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत माजी विद्यार्थी यांच्या २८ डिसेंबर रोजी होणाऱ्या स्नेहमेळाव्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे, स्नेहमेळावा समिती नियुक्ती करणे, अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळेच्या विषयावर चर्चा करून निर्णय घेणे आदी विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. सर्व कार्यकारिणी मंडळ, सर्व पदाधिकारी/सदस्य/निमंत्रित माजी विद्यार्थी यांनी सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवारातर्फे करण्यात आले आहे.
मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवार व निमंत्रित माजी विद्यार्थी यांची ०७ डिसेंबर रोजी संयुक्त सभा…
