व्हिजन घेऊन निवडणूक रिंगणात उतरल्याने आपला विजय निश्चित;मंदार ओरोसकर..
⚡मालवण ता.२५-:
मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग आठ मधील उबाठा शिवसेनेचे उमेदवार मंदार सुहास ओरसकर हे आपल्या प्रभागात जोरदार प्रचार करत असून आपणास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे मंदार ओरसकर यांनी सांगितले. या प्रभागासह मालवणच्या पुढील पन्नास वर्षातील विकासाचे व्हिजन घेऊन आपण मतदारांसमोर जात आहोत. या प्रभागात परिवर्तनच्या दृष्टीने मतदार मला साथ देतील आणि मालवण नगरपालिकेतही उबाठा शिवसेनेचाच भगवा फडकेल असा विश्वासही श्री ओरसकर यांनी व्यक्त केला.
मालवण प्रभाग आठ मध्ये मंदार ओरोसकर यांचा प्रभागातील नागरिकांशी सातत्याचा संपर्क असल्याने त्यांना मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी शहरातील महत्वाच्या अशा प्रभाग आठ अ मध्ये उबाठा शिवसेनेने युवासेनेचे पदाधिकारी मंदार ओरसकर यांना तसेच आठ ब मधून राष्ट्रीय काँग्रेसच्या सौ रुपाली सकपाळ फर्नांडीस यांना नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आहे. मंदार ओरसकर आणि सौ रुपाली सकपाळ फर्नांडीस हे या प्रभागात जोरदार प्रचार यंत्रणा राबवून घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत.
प्रचारा दरम्यान बोलताना मंदार ओरसकर म्हणाले, उबाठा शिवसेनेत युवासेनेचे पदाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतानाच प्रभाग आठसह मालवण शहरात आपण गेली काही वर्षे काम करत आहोत. असे सांगून ते म्हणाले, मालवण शहरातील प्रभाग आठ मध्ये बाजारपेठेचा समावेश असून मालवणच्या उद्योग व्यवसाय व व्यापाराच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा भाग आहे. या प्रभागासह मालवणच्या पुढील पन्नास वर्षातील विकासाचे व्हिजन घेऊन आपण मतदारांसमोर जात आहोत. या निवडणुकीत प्रभागाचा विकास किंबहुना मालवणचा विकास हे उद्दिष्ट घेऊन उतरलो आहे असे ते म्हणाले
