सीमा मठकर यांचा सावंतवाडी शहरात झंझावाती प्रचार…

सावंतवाडी : ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. सीमा मठकर यांनी आज प्रभाग क्रमांक 2 मध्ये जोरदार प्रचार केला. यावेळी शिवसेना नगरसेवक पदासाठीचे उमेदवार गजानन वाडकर, दीप्ती केसरकर यांचाही त्यांनी प्रचार केला. मनसे जिल्हाध्यक्ष अँड अनिल केसरकर यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.

मठकर म्हणाल्या, लोकांच्या भेटीगाठी आम्ही घेत आहोत. लोक सांगत असलेल्या समस्या ऐकत आहोत. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमचा भर असणार आहे. प्रचाराला चांगला प्रतिसाद ठाकरे शिवसेनेकडून मिळत आहे‌. त्यामुळे माझ्यासह दोन्ही नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page