बांदा/प्रतिनिधी
येथील नट वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या विष्णु गावकर, आडाळी पुरस्कृत (त्यांची पत्नी कै. सौ. विजयालक्ष्मी विष्णु गांवकर व सुपुत्र कै. श्री. बिपीन विष्णु गांवकर यांचे स्मरणार्थ) बालवाचक कथाकथन स्पर्धेत लहान गटात दक्ष वालावालकर (जि प शाळा सावंतवाडी नं. २) तर मोठ्या गटात समृद्धी देसाई (माध्यमिक विद्यालय, डेगवे) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित या स्पर्धेत एकूण ४५ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
दीपप्रज्वलन करून व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष नीलेश मोरजकर, विशाखा गावकर, विराज गावकर, संचालक शंकर नार्वेकर, जगन्नाथ सातोस्कर, प्रकाश पाणदरे, अनंत भाटे, गुरुनाथ नार्वेकर, बांदा केंद्रशाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर स्पर्धा तिसरी ते चौथी व पाचवी ते सातवी अशा दोन गटात घेण्यात आली. लहान गटासाठी शौयकथा व मोठ्या गटासाठी संतांच्या जीवनातील प्रसंग हे विषय देण्यात आले होते.
लहान गटात दिविया सार्थक वालावालकर जि. प. शाळा, सावंतवाडी नं. ४, स्वानंदी नाटेकर (जि. शाळा, इन्सुली नं. ६) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. चैताली सावंत – जि. प. शाळा, इन्सुली नं. ६ आणि धारा कोलगावकर (जि. प शाळा कळसुलकर, सावंतवाडी यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
मोठ्या गटात यश सावंत (मदरक्वीन्स इं. स्कूल, सावंतवाडी), दुर्वा नार्वेकर (मळगाव हायस्कूल, मळगाव) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. ईश्वरी पालव (नूतन माध्य. विद्यालय, इन्सुली व माही सरमळकर (जि. प. शाळा, सरमळे) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिस व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण बाळकृष्ण राणे व चंद्रकांत सावंत यांनी केले.
या कार्यक्रमाला वाचनालयाच्या सदस्या सौ. स्वप्निता सावंत, तसेच शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव राकेश केसरकर यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.
फोटो:-
बांदा येथे नट वाचनालयात आयोजित बालवाचक कथाकथन स्पर्धेचे दीपप्रज्वलन करून उदघाटन करताना मान्यवर.
नट वाचनालयात बालवाचक कथाकथन स्पर्धा उत्साहात पार…
