भोसले सैनिक स्कूलच उद्या भूमिपूजन सोहळा…

सावंतवाडी : श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित भोसले सैनिक स्कूल (यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल) भूमिपूजन आणि उ‌द्घाटन सोहळा उद्या शनिवार १५ नोव्हेंबर रोजी भोसले नॉलेज सिटी, चराठे (वझरवाडी) येथे आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी ९.०० वाजता भूमिपूजन व शिलान्यास सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी अरविंद कुडतरकर जिल्हा संघ चालक, (रा. स्व. संघ) सिंधुदुर्ग, नीरज चौधरकर प्रांत संघटन मंत्री, (अ. भा. वि. प. कोकण), ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर उपाध्यक्ष, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद, मेजर विनय देगावकर, अध्यक्ष, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद कोकण प्रांत उवस्थित राहणार आहेत. सकाळी ११.०० वाजता उदघाटन समारंभ पार पडणार आहे. यावेळी मस्य व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व अध्यक्षा ऍड सौ. अस्मिता सावंतभोसले सचिव संजीव देसाई यांनी केले आहे.

You cannot copy content of this page