न्या संपूर्णा गुंडेवाडी :जिल्हा न्यायालयाच्यावतीने न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बालदिन साजरा..
ओरोस ता १४
बालदिन हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त साजरा करतो. लहान मुलांवर अपार प्रेम करणाऱ्या नेहरु यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत. आजची मुले ही उद्याचा भारत आहेत. या महान नेत्याच्या विचारातून प्रेरणा घेण्यात यावी, असे आवाहन करतानाच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्या. संपूर्णा गुंडेवाडी यांनी बालदिन कार्यक्रमात जीवन जगत असताना मुलांनी कसे वागावे याबाबत मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी दिलेल्या निर्देशा नुसार प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एस.एस. इंदलकर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गच्या वतीने बालदिन १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता न्यू इंग्लिश स्कूल सिंधुदुर्गनगरी येथे साजरा करणेत आला. त्यावेळी न्या संपूर्णा गुंडेवाडी, न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका अनुजा चव्हाण, सहशिक्षक सदिच्छा कसालकर, रिदिमा पालव, प्रियांका डफळे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल जाधव, सदस्य सुशिल निब्रे, सदस्या श्रद्धा जाधव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लिपिक श्वेता सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी न्या संपूर्णा गुंडेवाडी यांनी बालदिनाचे महत्व सांगितले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल जाधव यांनी मुलांना बालदिनानिमित्त बहुमोल असे मार्गदर्शन केले. त्यानंतर मुलांनी चाचा नेहरूंबद्दल मराठी व इंग्रजी मध्ये भाषण सादर केले. तसेच त्यांच्या अगी असणारे विविध कलागुण सादर केले. या कार्यक्रमाचे सहशिक्षक सदिच्छा कसालकर यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका अनुजा चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.
फोटो ओळ: सिंधुदुर्गनगरी:
