नगरपंचायतींसाठी इच्छुक ३५० जणांची मुलाखत प्रक्रिया पूर्ण…

जिल्ह्यातील संपूर्ण परिस्थितीचा अहवाल प्रदेश कार्यालयाकडे सादर करणार:माजी आमदार प्रमोद जठार यांची माहिती…

⚡कणकवली ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी आणि कणकवली या नगरपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी सुमारे ३५० इच्छुकांनी मुलाखतींमध्ये सहभाग नोंदवला. कणकवलीमध्ये १७ नगरसेवक, मालवण येथे २०, वेंगुर्ले येथे २० आणि सावंतवाडीत २० नगरसेवक — अशा एकूण ७७ नगरसेवक आणि चार नगराध्यक्ष पदांसाठी ही मुलाखत प्रक्रिया पार पडली.

मुलाखतीदरम्यान उमेदवारांना आपण निवडणुकीला का लढू इच्छिता?, आपल्या प्रभागाचा विकास कसा साधणार?, समाजसेवेसाठी आपली भूमिका काय आहे? अशा विविध विषयांवर प्रश्न विचारण्यात आले.
या सर्व मुलाखतींचा अहवाल पक्षातर्फे प्रदेश कार्यालयाकडे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी आम. प्रमोद जठार यांनी कणकवली येथील प्रहार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत प्रमोद जठार बोलत होते.
यावेळी माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, सदा चव्हाण, भाजपा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत आदी उपस्थित होते.

माजी आ. प्रमोद जठार म्हणाले, राज्यात नगरपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. काही ठिकाणी आचारसंहिता लागू झालेली असतानाच, नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर निश्चित आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने निवडणूक तयारीला गती दिली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत अशा सर्व निवडणुकांचे नियोजन पहाण्यासाठी पक्षातर्फे प्रमोद जठार यांची जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. जठार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौरा सुरू असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा व्यापक कार्यक्रम बुधवारी पार पडला. बुधवारी जिल्ह्यातील निवडणूक समिती प्रमुख आणि प्रभारी तथा पालकमंत्री नाम. नितेश राणे, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आणि निवडणूक प्रमुख प्रमोद जठार या पाच सदस्यीय समितीने दिवसभर चारही नगरपंचायतींसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या,असेही ते म्हणाले.

You cannot copy content of this page